About Us

आमच्याबद्दल थोडसं

त्रकारितेच्या क्षेत्रात नवीन पायंडा पडणाऱ्यांपैकी “NGO खबर” हि एक ऑनलाईन वृत्तसंस्था आहे. सामाजिक नैतिकता आणि अस्मिता जपत मोलाचं योगदान करणाऱ्या गैर सरकारी संस्थांची खबर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. सामाजिक भान असलेले त्यांची मूल्य जपणारे काही निवडक पत्रकार एकत्र येत तुमचा विश्वास जपत योग्य खबर तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत.

एनजीओ ही एक अशी खाजगी स्वयंसेवी संस्था असते. जी सामाजिक कार्य करत असते. जिचा मुख्य हेतु हा सामाजिक कार्ये करणे हा असतो. यामध्ये बालधिकार, महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार, पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता, सुरक्षितता, जीवनशैली इत्यादी विषयांवर एनजीओ मार्फ़त कामे केली जातात.

एनजीओ ही एक अशी संघटना तसेच संस्था असते जी कोणीही चालवू शकतं. आपल्या देशपातळीवर अशी खुप सामाजिक कार्ये केली जातात. जी सरकारद्वारे न होता काही संस्थांद्वारे केली जातात. या वेब पोर्टलमध्ये सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक उपक्रम, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक संस्था तसेच नोकरी, फेलोशिप यांची प्रामुख्याने दखल घेतली जाणार आहे.

अशा संस्थांची कार्ये, मेहनत त्यांचे कष्ट आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम NGO खबर करणार आहे. NGO खबर च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारी आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मूल्य जपणारी खबर आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत.

आपण कोणत्या संस्थेमध्ये काम करत असाल, आपली स्वतःची संस्था असेल. कोणता सामाजिक उपक्रम चालवत असाल किंवा कार्यकर्ता म्हणून सातत्याने एखाद्या सामाजिक विषयांवर लिहीत असाल तर आपली प्रत्येक बातमी, लेख प्रसिद्ध कारण्यासाठी आम्ही तयार आहोत.

आमच्याशी पुढील इमेल आयडीवर संपर्क करू शकता…

info@ngokhabar.com

ngokhabar2021@gmail.com

टीम:- NGO ख़बर

Recent News

Translate >>