पुणे : अनहद सोशल फाऊंडेशनने आपला पहिला वर्धापनदिन मोठ्या आनंदात आणि साधेपणाने साजरा केला. सोसायटीत सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या वातावरणात, महिलांच्या हस्ते केक कापून वर्धापन सोहळा पार पडला. या प्रसंगी सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आनंदात सहभागी झाले.
महिला सबलीकरण हे अनहद सोशल फाऊंडेशनच्या कार्याचा मुख्य भाग आहे. याच उद्देशाने या वर्धापन सोहळ्यात महिलांना सन्मानाने पुढे आणले गेले आणि त्यांच्याच हस्ते केक कापण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालिका दीप्ती नितनवरे यांनी अनहद सोशल फाऊंडेशनच्या प्रवासाविषयी माहिती सांगितली. त्यांनी संस्थेचे उद्दिष्ट, सामाजिक योगदान आणि वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा घेतला.
उत्साहाने भरलेला हा सोहळा सोसायटीतील सर्व कुटुंबांसाठी विशेष बनला. प्रेम आणि साधेपणाने साजरा झालेला हा दिवस उपस्थितांच्या स्मरणात राहील असाच झाला.
अनहद सोशल फाऊंडेशन गेल्या एका वर्षात विविध उपक्रमाद्वारे आपले कार्य सुरु ठेवले आहे. विशेषतः, ‘Right to Love’ सारख्या उपक्रमांद्वारे संस्था अविरतपणे काम करत आहे.
अनहद सोशल फाऊंडेशन
मो. 8329174614 | 9766479547
ई-मेल: anhadsocialfoundation@gmail.com