पुणे : स्किलेट्झ फाऊंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे MNVTI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्मिती पुरस्कार 2025 सोहळ्यात भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महिला व बाल अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ॲड. दिपक सोनावणे यांच्या कामगिरीचे सादरीकरण पुणे विद्यापीठ प्र-कुलगुरू तसेच टिळक विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर सादर होणे हा एक अभिमानास्पद क्षण ठरला.
कार्यक्रमात टिळक विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रमुख रविंद्र देव यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव म्हणजे सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अथक प्रयत्नांची दखल घेण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यांनी केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान समाजातील प्रेरणा देणारा ठरतो.







