पुणे: सामाजिक बांधिलकी आणि सृजनशीलतेचा सुंदर संगम साधत ‘सखे सोबती मेहंदी टीम’ आणि Arise Vishwa Society यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज येथे रंगतदार उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे नियोजन संस्थेच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका पाटील यांच्या समन्वयातून झाले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच उत्साही व आनंदी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींसाठी खास मेहंदी सेशन ने झाली. मेहंदी कलाकार पूजा चाकणकर, यश चांडक, भावना चौधरी, पूजा ढोणे आणि अदिती गावडे यांनी सहभागींच्या हातांवर देखण्या व आकर्षक मेहंदी डिझाईन्स साकारले.
याचबरोबर क्रीडा उपक्रमांत नामदेव वर्वंतकर व अभिषेक भडके यांनी मुलांना खेळांतून उत्साहाने गुंतवून ठेवले. कार्यक्रमातील क्षण टिपण्याचे कार्य पारस शार्दुल यांनी प्रभावीरीत्या पार पाडले. उपक्रमानंतर मुलांसाठी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘सखे सोबती’ टीमतर्फे अराईज विश्व संस्थेच्या संचालक व CEO प्रियंका पाटील आणि वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ तसेच कार्यक्रम समन्वयक सौ. प्रज्ञा चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम केवळ कला, खेळ व आनंदाचा मेळ नसून, सामाजिक बांधिलकीतून सृजनशीलतेचा अविस्मरणीय अनुभव ठरला.








