इचलकरंजी : जागतिक योग दिन आणि वटपौर्णिमेच्या औचित्याने इचलकरंजीतील संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एक नवीन पर्यावरणपूरक पायंडा पाडला आहे. जोडीने वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला.
वटपौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाला दोरी बांधून सण साजरा करतात. याच भक्तिभावाच्या परंपरेला आधुनिक आणि विवेकी पर्याय देण्याचा संविधान परिवाराने प्रयत्न केला आहे. पर्यावरण प्रेमी निवृत्त प्राचार्य उदय मुंगर्डेकर यांनी जोडीने वृक्ष लावून समाजात विवेकी पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमात वृक्षमित्र निलेश बनगे, साने गुरुजी सांस्कृतिक युवा मंचचे अनिल होगाडे, संविधान संवादक रोहित दळवी, दामोदर कोळी, मासूमचे फेलो रुचिता पाटील, अमित कोवे, समाजबंधच्या वैभवी आढाव, संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर, आदित्य धनवडे, ऋतिक बनसोडे, आदिरा आणि संजय रेंदाळकर उपस्थित होते.