मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर, लक्ष्मी नगर, इंदिरा नगर परिसरातील साफसफाई करणाऱ्या कामगारांचा भाकर फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने रक्षण करणारे सफाई कामगार असतात त्यांच्या या कामाची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे म्हणून महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी, अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या हस्ते या सफाई कामगारांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला असे भाकरचे अध्यक्ष दीपक सोनावणे यांनी सांगितले.
यावेळी भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक सोनावणे, संचालक धनश्री नाईक, तसेच आरती डोईफोडे, मयुर जाधव, उर्वी विरा, प्रशांत चव्हाण, दिपक भालेराव आणि सफाई कामगार (पर्यावरण रक्षक) उपस्थित होते