कोल्हापूर : लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शाहू महाराजांच्या कृतीतून निर्माण झालेल्या विविध स्थळांना प्रत्यक्ष भेटून विचार जाणून घेण्यासाठी लोकराजा शाहू दर्शन पर्यटन या उपक्रमाची शाहू जयंतीच्या निमित्ताने सुरुवात करण्यात आली.
इचलकरंजी येथील पर्यटकांनी आज या उपक्रमाद्वारे कसबा बावडा येथील शाहू महाराजांचे जन्मस्थान लक्ष्मी विलास पॅलेस, न्यू पॅलेस, दसरा चौक आणि परिसरातील विविध विद्यार्थी वसतिगृहे, शाहू महाराजांनी सुरू केलेला सोनतळी येथील स्काऊट कॅम्प, शाहू महाराजांचे स्मृतिस्थळ, गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेले हॉटेलचे ठिकाण, टाऊन हॉल, भवानी मंडप, जुना राजवाडा, खासबाग कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, साठमारीचे ठिकाण, शाहू मिल आणि विद्यापीठातील वस्तू संग्रहालय या ठिकाणांना भेटी देऊन शाहू महाराजांचा इतिहास त्यांचा विचार आणि कृती समजून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी संविधान संवादक प्रशिक्षण केंद्राचे कार्याध्यक्ष सुनील स्वामी, कृष्णात स्वाती, रेश्मा खाडे, संजय रेंदाळकर उपस्थित होते. देवदत्त कुंभार यांनी गाईड म्हणून काम पाहिले. सचिन पाटोळे यांनी सहलीचे नियोजन केले. यामध्ये अशोक केसरकर, नौशाद शेडबाळे, सुरेश कोळी, गोपीनाथ कांबळे, दादासाहेब चौगुले, दिपाली कुंभार, सोहम पाटोळे, तेजस पाटोळे, सिद्धी कुंभार, दिपाली चौगुले, सुनिता कांबळे, साधना पाटोळे यांनी सहभाग नोंदवला.जिज्ञासू लोकांसाठी वाहन आणि मार्गदर्शक पुरवून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला जाणार आहे.