मुंबई : OYA फाऊंडेशन आणि भाकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर आणि नया नगर येथील १५० गरजू विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोबत मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळ आणि गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी OYA फाऊंडेशनचे प्रमुख राहीन जुमानी आणि सदस्य, भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दिपक सोनावणे आणि सदस्य, चाऊस शेख इत्यादी कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.