पुणे : महानगरपालिकेतील ५० अंगणवाडी केंद्रातील आणि त्यांच्या आजूबाजूच्या समुदायातील ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांचे पायाभूत शिक्षण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी युनायटेड वे दिल्ली ही संस्था बजाज फिनसर्व्हच्या आर्थिक सहकार्याने ‘नीव’ प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे महिला बाल विकास प्रकल्पातील अंगणवाड्यांमध्ये करत आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १२ अंगणवाड्यांमध्ये नियोजित काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्पाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरला आहे. युनायटेड वे दिल्ली ही संस्था मुलांसाठी सक्षम आणि सुरक्षित शिक्षण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वयास अनुसरून त्यांचा आरोग्य, पोषण, शैक्षणिक आणि सामाजिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून काम केले जाते.
या प्रकल्प अंतर्गत निवडलेली अंगणवाडी केंद्रे पायाभूत सुविधांनी सुसज्ज केली गेली आहेत. यात प्रामुख्याने मुलांच्या दृष्टीने भिंतीवर बिल्डिंग अँड लर्निंग एड (BALA) भित्तिचित्रे, शैक्षणिक साहित्य व साधने आणि इतर शैक्षणिक संसाधने सामाविष्ट केली आहेत. तसेच पालक, काळजीवाहक, शिक्षक आणि मुख्य भागीदार गट व व्यक्ती यांचा सतत सहभाग कसा राहील यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक मुलाच्या विकासात्मक टप्पे पूर्ण करण्यासाठी मुलांच्या वयोमानानुसार उपलब्धी सुनिश्चित करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. या प्रकल्प अंतर्गत सर्वोत्तम मुलांसाठी बालसुलभ पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. या कार्यक्रमास सर्वांचा उत्तम प्रतिसाद व सहकार्य लाभत आहे.
‘नीव’ कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लीना राजन, CSR समिती, बजाज फिनसर्व्ह आणि सन्माननीय अतिथी म्हणून श्रीमती संध्या नगरकर, अतिरिक्त आयुक्त महिला बालविकास, उपस्थित होते. तसेच श्रीमती बिलारीस, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, आणि युनायटेड वे दिल्लीचे CEO सुजीत रंजन उपस्थित होते. १० जुलै २०२४ रोजी कै. पै. वस्ताद हरिभाऊ पोकळे शाळा, पुणे येथे त्यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमांतर्गत अंगणवाड्या सर्वार्थाने उत्तम बनत आहेत, आणि कार्यक्रमाच्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली.
बजाज फिनसर्व्ह व महिला बालविकास यांच्या भक्कम पाठिंब्याने व मार्गदर्शनाने युनायटेड वे दिल्ली या प्रकल्पातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम करत आहे.सहयोग ही एक शाश्वत सामाजिक प्रभावाची गुरुकिल्ली आहे ज्यामध्ये प्रत्येकाने समान ध्येयासाठी आपली भूमिका बजावली आहे. या अंतर्गत आम्ही यापुढेही सर्व मुलांसाठी एक उत्तम, सुरक्षित आणि सुधारित स्थान सुनिश्चित करण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवू. उज्ज्वल आणि अधिक आशादायक भविष्यासाठी सर्व मुलांची वाढ आणि विकास कसा होईल याकडे लक्ष देऊ.