भोपाळ ( मध्य प्रदेश ) : रूम टू रीड इंडियाने राज्य शिक्षा केंद्र, भोपाळ (मध्य प्रदेश) यांच्या सहकार्याने दर्जेदार बालसाहित्य विकसित करण्यासाठी ४ दिवसीय निवासी चित्रण कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्यशाळेत सरकारी शिक्षकांनी लिहिलेल्या १५ कथा चित्रित करण्यावर भर देण्यात आला. शाळेतील मुलांमधील भाषा आणि साक्षरता कौशल्ये वाढवणाऱ्या साहित्याची विविधता समृद्ध करणे ही चित्रपुस्तकांची निर्मिती करण्यामागची संकल्पना होती. हे साध्य करण्यासाठी १५ चित्रकारांनी सल्लागार आणि रूम टू रीड इंडियाच्या मार्गदर्शनाखाली कथांवर काम केले.