सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शहर कार्यकारणीच्या अध्यक्षपदी गीता ठाकर तर कार्याध्यक्षपदी आशा धनाले आणि सचिव पदी डॉ. सविता अक्कोळे यांची आज सर्वमताने निवड झाली. कार्यकारणी निवड निरीक्षक म्हणून राज्य कमिटी सदस्य राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी काम पाहिले.
आज सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संजयनगर कार्यालयात महापालिका क्षेत्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सांगली शहर ची दोन वर्षाकरिता असणारी कार्यकारिणी गठीत केली गेली.
निवड झालेली कार्यकारणी पुढील प्रमाणे…
अध्यक्ष गीता ठाकर, उपाध्यक्ष उषाताई आर्डे, कार्याध्यक्ष आशा धनाले, सचिव डॉ. सविता अक्कोळे, त्याचबरोबर विविध विभागाचे कार्यवाह यांचीही निवड केली गेली ती पुढील प्रमाणे… बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह चंद्रकांत वंजाळे, महिला सहभाग विभाग धनश्री साळुंखे,सांस्कृतिक विभाग त्रिशला शहा, वैज्ञानिक जाणीव विभाग संजय गलगले, वार्तापत्र आणि प्रकाशन विभाग प्रा. अमित ठाकर, मानसिक आरोग्य विभाग डॉ. संजय निटवे, युवा, विवेक वाहिनी हर्षवर्धन सावंत, सोशल मीडिया विभाग श्रीकृष्ण कोरे, विविध उपक्रम विभाग इम्रान बुद्धीहाळ, प्रशिक्षण विभाग अण्णा गेजगे, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह साह्य विभाग इंजि. अविनाश कांबळे, कायदा विभाग अँड. सुधीर गावडे.
या नूतन कार्यकारणीचा सत्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके देऊन ज्येष्ठ विज्ञान लेखक जगदीश काबरे यांच्या हस्ते केला गेला. या नूतन कार्यकारिणीने सांगली शहरात शहरातील विविध शाळांच्यामधून अंधश्रद्धा निर्मूलन, हसत खेळत विज्ञानाचे कार्यक्रम, जटा निर्मूलन असे उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.