• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कारासाठी रेश्मा पिरजादे व अस्मिता पवार यांची निवड; अग्रणी फाऊंडेशनची घोषणा

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
C553040e Ced1 40c5 A55f C10ec91e2b08 1.jpg
309
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सांगली ( विटा ) : अग्रणी सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व वंचित समाजाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणाऱ्या भटके विमुक्त समाजातील अस्मिता पवार, विटा हायस्कूल विटा व अल्पसंख्याक समाजातील रेश्मा पिरजादे, शेठ च.ग.शहा विद्यामंदिर लेंगरे, या दोन्ही शिक्षिकेंना महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त ( खरा शिक्षक दिन) २८ नोव्हेंबरला हा पुरस्कार विटा, जि. सांगली येथे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.


भटके विमुक्त व अल्पसंख्याक समाजात शिक्षणाबाबत पाहिजे तेवढ्या प्रमाणात जनजागृती नाही त्यामुळे या दोन समुहातील शिक्षकांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध भटके विमुक्त समाजातील साहित्यिक अशोक पवार व ग्रामीण पत्रकार सादिक खाटीक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


ज्या महामानवाने उपेक्षित समाजाला शिक्षणाची प्रेरणा दिली, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शिष्योत्तमा फातिमा शेख यांच्या कार्यास अभिवादन करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


शिक्षणासारखा महत्वपूर्ण विषय हा संस्थेच्या मुख्य ऊद्दिष्टामध्ये समाविष्ट आहे. संस्थेने सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कार २०२३ देण्यासाठी कार्यक्षेत्रातील भटके विमुक्त समाजातील व अल्पसंख्याक समाजातील कर्तुत्ववान व प्रतिभावान महिला शिक्षिका अशा दोघींची निवड करून त्यांना महात्मा फुले यांचा ग्रंथ, शाल, एक रोप, पदक व मानपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्काराची घोषणा संस्थेच्या मुख्य संचालिका शोभाताई लोंढे, संस्थापक आप्पासाहेब माने, संघटक चांदभाई शेख व संचालिका यास्मिन पिरजादे, रिटा माने, मायाताई पाटील, मंदाताई सोनताटे यांनी केली.

Previous Post

बाल, किशोर आणि युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अराईस विश्व सोसायटी’चा “अवली” प्रकल्प !

Next Post

नंदीवाले समाज जात बांधवांचे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयाबाबत प्रबोधन

Next Post
E6fb5a93 D37a 4b64 A7b4 0f2ca2a7de24 1.jpg

नंदीवाले समाज जात बांधवांचे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयाबाबत प्रबोधन

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version