पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ आज निगडी लाइटहाऊस येथे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. नीलकंठ पोमण, (मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी), मा. मुकेश कोळप, (नगरसचिव), मा. प्रफुल्ल पुराणिक, (जनसंपर्क अधिकारी) आणि मा. विवेक वावरे, (CSR विभाग) उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कौशल्यम्’ या उपक्रमाअंतर्गत आज विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणाद्वारे तरुणाईत आत्मविश्वास, रोजगार संधी आणि उद्योजकतेची नवी दालने खुली होत असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगितल्या. “कौशल्य हे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन नाही, तर आत्मनिर्भरतेचा पाया आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्साहवर्धक पद्धतीने करण्यात आले. शेवटी आभारप्रदर्शन करून समारंभाचा समारोप झाला.








