पुणे: बजाज फिनसर्व्हच्या आर्थिक सहकार्याने, युनायटेड वे दिल्ली आणि पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘NEEV’ प्रकल्पाअंतर्गत बालवाडी शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत २१७ शिक्षकांनी सहभाग घेतला, ज्यात मराठी आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांचा समावेश होता.
युनायटेड वे दिल्ली संस्थेने पुणे महानगरपालिकेतील १९० बालवाडी केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांची सुधारणा केली आहे, ज्यात शैक्षणिक साहित्य, BALA भित्तिचित्रे आणि इतर संसाधने यांचा समावेश आहे. तसेच, शालेय कार्यक्रमांमध्ये पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत.
प्रशिक्षणामध्ये गटकार्य, भाषा विकास, गणितीय संकल्पना, आणि खेळाच्या माध्यमातून शिकण्याची जागृती निर्माण करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमती विजया महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण म.न.पा. गोगटे शाळे येथे घेण्यात आले.







