पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लक्ष्मीनगर, जनता वसाहत येथे दोन दिवस मुक्कामी आलेल्या वारकरी बांधवांना कोकण भुमिपुत्र कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोहारचे वाटप करण्यात आले.
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून पंधरा दिवसांच्या पायी वारीसाठी आलेल्या प्रत्येक वारकरी भाविकांना राजगिरा लाडू व दिंडीतील भाविकांना फरसाण, वेफर्स, लाडू, बिस्किटे या सुक्क्या अल्पोहारचे किट देण्यात आले. या उपक्रमासाठी दानशूर समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी तुषार खांबे, विजय शिंदे, पूर्वेश मळेकर, ऋषिकेश लाड, ऋषिकेश कवडे, वृषाल खांबे, प्रथम हूंबरे, वैभव गोमले, प्रसाद बोले, वृषाली गोरीवले, पूजा गावडे, दर्शना निकम, सरिता बोबले, अक्षय निकम, रोहित निकम, रोहन गावडे, मिलिंद रेवाळे, सुशांत शिगवण, मोहन मळेकर, तेजस कडव, तेजस खांबे, प्रथमेश जाधव, अनिल जाधव, मंदार पाटिल आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी आणि हितचिंतक व देणगीदार यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.











