सेफ किड्स फाउंडेशनद्वारे फटाके सुरक्षा बाबत शाळांमध्ये जनजागृती

दिवाळी हा प्रकाशाचा सण.  एका नवीन पर्वाचा प्रारंभ असलेला हा दीपोत्सव, प्रकाशाचा अंधारावर तसेच सत्याचा असत्यावर विजय म्हणून देशभरात अतिशय उत्साहात व आनंदात साजरा केला जातो.  अतिशय सुंदर पध्द्तीने सजवलेली घरे व रस्ते उत्सवाचे वातावरण निर्माण दर्शवतात.  भारत देशात अजूनही कोरोनाचे सावट आहे व अजूनही परिस्थिती पूर्ण सामान्य झालेली नाही.  याच धर्तीवर सेफ किड्स फाउंडेशनद्वारे सर्व नागरिकांना व विशेष करून लहान मुलांना ही दिवाळी सुरक्षित पध्द्तीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या वर्षीच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आग व भाजणे या विषयाबाबत जागरूकता निर्माण करून पुणे शहरात आगीच्या घटना टाळण्यासाठी फटाके सुरक्षा या विषयावर आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  पुण्यातील ९ शाळांमधून ६७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.  या स्पर्धेत अतिशय भरीव कामगिरी करत अमुल्या अरविंद खारमाटे (इ. ५ वी, जयवंत पब्लिक स्कुल) हिने प्रथम, पिंकी देवराम चौधरी (इ. ८ वी, सिग्नेट पब्लिक स्कुल) हिने श्रुतिका संतोष शिंदे (इ. ७ वी सिग्नेट पब्लिक स्कुल) हिने अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले.    

दिवाळीदरम्यान आग व भाजण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय न पाळता फटाके पेटवणे हे होय.  म्हणून सर्वांनी पुढील सुरक्षा संदेशांचा वापर करूनच फटाके पेटवण्याचा आनंद घ्यावा व आग आणि भाजण्याच्या घटनास आळा घालावा असे आवाहन सेफ किड्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे.

ही सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे कडकपणे पालन करून या वर्षीची दिवाळी ही सुरक्षित व आनंदी दिवाळी म्हणून साजरी करूया.         

या प्रसंगी बोलतांना संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या की, “सेफ किड्स फाउंडेशनद्वारे वर्षभर अग्निसुरक्षा बाबत जनजागृती केली जाते व आतापर्यंत अकरा लाख बालकांना व पालकांना अग्निसुरक्षा या विषयात प्रशिक्षित केले आहे.  या वर्षीसुद्धा संस्थेने ऑनलाईन जनजागृती अभियान राबवत विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये संवेदनशीलता निर्माण केली आहे.  एकूण ४७ शाळा व महाविद्यालयांमध्ये सदर जागृती अभियान राबवण्यात आले.  एकही आग व भाजण्याची दुर्घटना होऊ न देणे व एकही बालक आगीच्या दुर्घटनेस बळी पडू नये हे संस्थेचे उद्देश आहे.  संस्थेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आवश्यक ते सर्व सुरक्षा उपाययोजना पाळून या वर्षीची दिवाळी ही सुरक्षित व आनंदी दिवाळी म्हणून साजरी करावी.  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.”

Exit mobile version