मुंबई : एकात्मिक बालविकास योजना गोरेगाव पूर्व प्रकल्प बिट नं ६ यांच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमे अंतर्गत बाल अधिकार व बाल संरक्षण या विषयावर माहिती सत्र आयोजित करण्यात आले होते. अंगणवाडी सेविका रंजना जायभाये यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दिपक सोनावणे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि पालकांना बाल अधिकार, बाल संरक्षण, बाल लैंगिक शोषण या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बिट ६ च्या मुख्यसेविका स्वाती महाडिक व टिसच्या तृतीयपंथी विद्यार्थी ऋषाली दिशा, सामाजिक कार्यकर्त्या कार्तिकी चुरी, समाजकार्य विद्यार्थी चंदा कांबळे उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.