• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Tuesday, August 18, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
Img 3264 1.jpg
310
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, 14 फेब्रुवारी – अनहद सोशल फाऊंडेशन प्रस्तुत आणि राईट टू लव्ह आयोजित भव्य ‘प्रेमोत्सव’ जोरदार साजरा झाला. प्रेमाला कोणत्याही चौकटीत न अडकवता, ते मुक्त आणि निर्भय असावे हा संदेश देत पुण्यातील बालगंधर्व पोलीस चौकी, जे. एम. रोड येथे या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या प्रेमोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे राईट टू लव्ह चळवळीला दहा वर्षे पूर्ण झाल्याचा महत्वपूर्ण टप्पा! या दशकभराच्या प्रवासाला साजरा करत ‘एका दशकाचा प्रवास… प्रेम, संघर्ष आणि अधिकाराचा’ ही टॅगलाइन या उत्सवासाठी वापरण्यात आली.

प्रेमाची भाषा – 16 भारतीय भाषांमधून संदेश

या वर्षीच्या प्रेमोत्सवाची संकल्पना होती – “प्रेमाला भाषा नसते”. या संदेशाला मूर्त स्वरूप देत हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली, उर्दू, गुजराती, पंजाबी, ओडिया, कन्नड, मल्याळम, असमिया, संस्कृत, कश्मिरी, संथाली आणि मैथिली अशा 16 प्रमुख भारतीय भाषांमध्ये ‘प्रेम’ हा शब्द असलेल्या आकर्षक पोस्टर्स लावण्यात आले होते.

रंग, सुगंध, संगीत आणि रोमँटिक वाऱ्यांनी भारलेला माहोल

उत्सवस्थळी रोमँटिक आणि उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी बदामाच्या आकारातील लाल फुगे, चॉकलेट्स, शहनाई वर वाजवली जाणारी 90 दशकातील प्रेमाची गाणी, गुलाब फ्लेवर अत्तर-धूप आणि खास बदामाच्या आकाराचा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर राहुल सिद्धार्थ साळवे यांच्या प्रसिद्ध ओळी –

“केवळ सोबतीची नाही, प्रेम गोष्ट असते सावलीची” आकर्षकपणे वापरण्यात आल्या होत्या. ज्यामुळे अनेक प्रेमी जोडपी फोटोसाठी आकर्षित झाले.

प्रेमोत्सवात मान्यवरांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

या अनोख्या उत्सवाला राईट टू लव्ह आणि अनहद सोशल फाऊंडेशनचे संचालक के. अभिजीत, स्टेक मीडियाचे श्रीजित रसाळ, सुचिता सावंत, चित्रपट आर्ट दिग्दर्शक संतोष संखद, सोनाली मॅम, तिलोक भालेराव, प्रगत पडघन, अक्षय धावडीकर, अमरजा शिंदे, वैभव, कवी मिलिंद दामोदरे, सागर काकडे, जितेन सोनावणे यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

प्रेमाला निर्भयतेची साथ

दरवर्षीप्रमाणे राईट टू लव्ह च्या वतीने प्रेमाला निर्भयतेची आणि समानतेची साथ मिळावी, हा संदेश देण्यासाठी या प्रेमोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रेम ही केवळ भावना नसून तो एक हक्क आहे, याच जाणीवेतून राईट टू लव्हच्या कार्यकर्त्यांनी हे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू ठेवले आहे.

प्रेम हे बंधनमुक्त असावे, ते निर्भय असावे आणि प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे प्रेम करण्याचा अधिकार उपभोगावा – हाच संदेश घेऊन प्रेमोत्सव 2025 ने एक अविस्मरणीय ठसा उमटवला!

के. अभिजीत 

संचालक – राईट टू लव्ह – अनहद सोशल फाऊंडेशन

Previous Post

शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण

Next Post

“मुलींच्या पायातील रुढी परंपरेच्या बेड्या तोडण्यासाठी- किशोरी प्रशिक्षण एक आशेचा किरण”

Next Post
Img 3436 2 1.jpg

“मुलींच्या पायातील रुढी परंपरेच्या बेड्या तोडण्यासाठी- किशोरी प्रशिक्षण एक आशेचा किरण”

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version