मुंबई : भाकर फाऊंडेशन सेंटरला अग्निशमन विभागाचे विभागीय अधिकारी एकनाथ भिमराव मताले आणि अग्निशमन दलाचे अधिकारी योगेश शेलार यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी एकनाथ मताले यांनी उपस्थित बालक आणि युवकांना मार्गदर्शन केले. भाकर फाऊंडेशन मार्फत सुरू असलेल्या बाल सभा, पौष्टिक आहार, ग्रंथालय, स्पोर्ट्स हाऊस, पॅड प्रोजेक्ट, सखी संवाद, शैक्षणिक भेट, प्रशिक्षण, समुपदेशन आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती अशा विविध प्रकल्प उपक्रमांची माहिती घेतली.
मताले आणि शेलार यांनी भाकर फाउंडेशनच्या सुरू असलेल्या कार्याला शुभेच्छा देऊन संस्थेच्या पुढील कार्यासाठी देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली. संस्थेच्या वतीने दीपक सोनवणे यांनी आभार मानले.