यवतमाळ : ग्रँड मराठा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील वंचित विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि स्टेशनरी किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व जीएमएफ आणि पुण्याच्या शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टने केले.
या उपक्रमाविषयी बोलताना ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले कि, ग्रॅंड मराठा फाऊंडेशनचे ध्येय विविध उपक्रमांद्वारे वंचितांना सक्षम करणे, दर्जेदार शिक्षण आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य स्वरूपाचे सहाय्य करणे आहे. सेवा नसलेल्या लोकांना आधार देणे आणि त्यांच्या भल्यासाठी काम करणे हे नेहमी संस्थेचे प्राधान्य आहे.
हा उपक्रम माधवी शेलटकर विश्वस्त GMF; आणि रोहित शेलटकर संस्थापक GMF; यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला होता. यावेळी शालेय साहित्य वितरणास ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी मदत केली.