• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 11, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 11, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home सामाजिक उपक्रम

जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घेऊयात ८ गैरसमजुती

समता सैनिक दलातर्फे जनहितार्थ जारी संदेश

NGO ख़बर by NGO ख़बर
December 1, 2021
in सामाजिक उपक्रम
489
0
303
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आज जागतिक AIDS दिनाच्या निमित्ताने सामान्यत: आढळणाऱ्या अशाच अंधश्रद्धांना किंवा मिथकांना दूर करण्याचा प्रयत्न.

HIV चा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
HIV ची लागण हे AIDSचं सगळ्यात मोठं कारण आहे. या विषाणूची बाधा झालेले एकूण 3.7 कोटी लोक जगभरात आहे. त्यापैकी 70% लोक एकट्या आफ्रिका खंडात आहे.
२०१७ मध्ये १८ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. गेल्या वर्षी जगभरात 10 लाख लोकांचा HIV शी निगडित रोगांमुळे मृत्यू झाला आहे. हा रोग १९८० च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIV ची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक समाज माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतंय.

समज – १
HIV+ लोकांच्या आसपास वावरल्याने AIDS होऊ शकतो ?
या गैरसमजुतीमुळे HIV बाधित लोकांशी समाजात खूप भेदभाव केला जातो. याविषयी वेळोवेळी जागरूकता पसरवून सुद्धा UK मध्ये अजूनही २०% लोकांना असं वाटतं की HIV बाधितांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या लाळेतून पसरतो. HIV विषाणूची चाचणी करण्यासाठी रक्ततपासणी करण्याची गरज असते.
खरं काय ?
पण खरच हा रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही.
त्याचप्रमाणे पुढीलपैकी कोणत्याही मार्गाने HIV चा संसर्ग होत नाही-
एकाच हवेत श्वास घेणं
हात मिळवणं, मिठी किंवा चुंबन घेणं
एकाच भांड्यात खाणं-पिणं
पाण्याचा समान स्रोत वापरणं (उदा. अंघोळीचं पाणी, शॉवर)
खासगी वस्तू शेअर करणं
जिममध्ये व्यायामाची समान साधनं वापरणं
टॉयलेट सीटला, दरवाजाच्या कडीला स्पर्श करणं
HIV बाधित व्यक्तीचं रक्त, वीर्य, योनीतील स्राव किंवा अंगावरचं दूध निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेलं तरच हा रोग पसरण्याची शक्यता असते.

समज – २
अघोरी प्रकारांमुळे HIV बरा होतो ?
पर्यायी औषधं, सेक्स केल्यानंतर अंघोळ करणं, किंवा कुमारिका मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करणं या सगळ्या गोष्टींमुळे हा रोग बरा होत नाही.
Virgin Cleansing (कुमारिका मुलींबरोबर सेक्स करणं) चा गैरसमज निम-वाळवंटी आफ्रिका, भारतातला काही भाग आणि थायलंडमध्ये प्रचलित आहे. तो अतिशय धोकादायक आहे.
यामुळे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर लहान बालकांवरही बलात्कार होतो आणि पर्यायाने त्यांनाही HIVचा धोका बळावतो.
या मिथकाचं मूळ 16व्या शतकात पहायला मिळतं. त्यावेळी लोकांना सिफिलीस आणि गन्होरिया या गुप्तरोगांची लागण व्हायला सुरुवात झाली होती.
मात्र कुमारिका मुलींबरोबर सेक्स केल्यामुळे हे रोगही बरे होत नाहीत.
हा रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही.
अशा वेळी धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्यामुळे या कठीण प्रसंगात मानसिक बळ नक्कीच मिळू शकतं. मात्र असं केल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या काहीच दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

समज – ३
डासांमुळे HIV पसरतो ?
रक्तामुळे HIV पसरतो हे जरी खरं असलं तरी अनेक संशोधनांअंती हे सिद्ध झालं आहे की रक्तपिपासू कीटकांद्वारे(उदा. डास) हा रोग पसरत नाही. त्याची दोन कारणं आहेत
१) जेव्हा कीटक चावतात तेव्हा त्यांनी आधी चावा घेतलेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीत सोडत नाहीत.
२) HIVचा विषाणू त्यांच्या शरीरात अल्पकाळ टिकतो.
त्यामुळे एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात डास असतील आणि HIVचा प्रादुर्भाव असेल तरी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही.

समज – ४
मुखमैथुनाद्वारे HIV होतो ?
सेक्सच्या इतर प्रकारांपेक्षा ओरल सेक्स म्हणजेच मुखमैथून बऱ्यापैकी सुरक्षित आहे, हे खरं आहे. 10,000 पैकी फक्त 4 केसेसमध्येच AIDS ओरल सेक्सद्वारे पसरतो, असं लक्षात आलं आहे.
कंडोम ? 
कंडोममुळे HIVचा संसर्ग गुप्तरोगांचा संसर्गही होत नाही.
मात्र ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला HIVची लागण झाली आहे, त्या पुरुषाबरोबर किंवा स्त्रीबरोबर ओरल सेक्स केला तर HIVची लागण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ओरल सेक्सच्या वेळीही कंडोम वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

समज – ५ 
कंडोम वापरल्यास HIV ची लागण होत नाही ?
सेक्स करताना कंडोम फाटला, निघाला किंवा लीक झाला तर HIV ची लागण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे AIDS बाबत जे जनजागृती अभियान राबवले जातात, त्यात लॅटेक्स शीथ म्हणजेच जाड कंडोम घालण्याचा सल्ला तर देतात. मात्र त्याचबरोबर HIVची चाचणी करण्याचाही सल्ला देतात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब उपचार घेण्याचा सल्ला देतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चारपैकी एका जणाला, म्हणजे तब्बल 94 लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याची माहिती नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.

समज – ६
लक्षणं नाहीत, म्हणजे HIV नाही ?
एखाद्या व्यक्तीला अगदी १०-१५  वर्षं या रोगाची लक्षणं जाणवत नाहीत. त्यांना ताप, डोकेदुखी, पुरळ, घसा खवखवणं ही साधारणपणे फ्लूची लक्षणं आढळतात.
चारपैकी एका व्यक्तीला HIV ची लागण झाल्याची कल्पना नसते.
या रोगामुळे जसजशी प्रतिकारक शक्ती कमी होते तसतशी लिंफ नोड सुजणे, वजन घटणे, ताप, डायरिया आणि खोकला, अशी इतर लक्षणंही दिसायला सुरुवात होते.
जर उपचार घेतले नाहीत तर इतर गंभीर आजार व्हायला सुरुवात होते. त्यात क्षयरोग, मेंदूज्वर, जीवाणूसंसर्ग किंवा कॅन्सरचा धोका संभवतो.

समज – ७ 
HIV बाधित लोक लवकर दगावतात ?
ज्या लोकांना HIVची लागण झाली आहे, जे उपचार घेत आहेत, ते चांगलं आयुष्य जगत आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या मते ४७ % लोकांच्या रक्तात HIV चं प्रमाण इतकं कमी आहे की रक्तचाचण्यांमध्ये हे विषाणू दिसतही नाहीत. ज्या लोकांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्या लोकांकडून हे विषाणू दुसऱ्यांपर्यंत पसरतही नाहीत.
मात्र त्यांनी जर उपचार घेणं थांबवलं तर HIV पुन्हा रक्तात सापडू शकतो.
आई आणि बाळ ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2017 मध्ये 2.17 कोटी रुग्ण रेट्रोविषाणू प्रतिबंधक उपचार घेत होते. 2010 मध्ये ही संख्या 80 लाख होती. ज्या लोकांना HIVची लागण झाल्याची कल्पना आहे, त्यांच्यापैकी 78% लोक उपचार घेत आहेत, असा या आकडेवारीचा अर्थ होतो.

समज – ८ 
आई HIV बाधित असेल तर मुलांनाही होतो ?
हे अगदीच सत्य नाही. ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो, त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात.

Share121SendTweet76Share21
Previous Post

सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कर

Next Post

प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य समाजाला दिशा देणारे ठरेल – डॉ रवींद्र कोल्हे

Related Posts

जाती-धर्माच्या भिंती तोडल्या! प्रा. श्रेयस आणि प्रा. ॲड. करिश्मा यांची सत्यशोधक पद्धतीने ‘संविधानिक’ गाठ.
सामाजिक उपक्रम

जाती-धर्माच्या भिंती तोडल्या! प्रा. श्रेयस आणि प्रा. ॲड. करिश्मा यांची सत्यशोधक पद्धतीने ‘संविधानिक’ गाठ.

May 7, 2026
Img 1190 1.jpg
सामाजिक उपक्रम

पुण्यात सत्यशोधक युवा परिषदेत महात्मा फुल्यांच्या विचारांचा जागर !

September 30, 2024
A9543b87 2d6b 437b A882 8db0bdf87ee2 1.jpg
सामाजिक उपक्रम

वटपौर्णिमेला संविधान परिवारचा पर्यावरणपूरक उपक्रम: “झाडाला दोरी नाही, जोडीनं झाडच लावले”

June 22, 2024
सामाजिक उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न

April 23, 2024
2d0f9137 E8ef 4b69 8fac 160f101c783a 1.jpg
सामाजिक उपक्रम

‘भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात’ महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम

April 9, 2024
De3513fb 5f0e 444d B3f5 Dccc8e80906b 1.jpg
सामाजिक उपक्रम

संविधान दालन तयार करणारी सुकलवाडी ही पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत

March 14, 2024
Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version