पालघर : जाणीव फाऊंडेशनच्या वतीने विक्रमगड तालुक्यातील जांभे व पोचाडे येथील जिल्हा परिषद शाळेत बालमेळावा– शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेची बॅग भेट देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तसेच आर्थिक स्वरूपात किंवा वस्तुस्वरूपात मदत केल्याबद्दल सर्व दानशूरांचे संस्थेचे अध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.