• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, August 17, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून आगळावेगळा उपक्रम

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
314
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिर्डी : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम केलं जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरूवात आजपासून श्रीरामपूर येथून करण्यात आली. रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे‌.

सामाजिक न्याय विभागाच्या अहमदनगर सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने जन शिक्षण संस्थानच्या सहकार्याने ओळखपत्र प्राप्त तृतीयपंथीयांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचे २० जूलै रोजी श्रीरामपूर येथे उद्घाटन करण्यात आले. श्रीरामपूर येथील तृतीयपंथीय समाज आश्रम येथे २३ जूलै पर्यंत ही प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न होणार आहे.

या कार्यशाळा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नुरजहा शेख होत्या. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे दिग्विजय जामदार, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, तलाठी राजेश घोरपडे, जन शिक्षण संस्थानाचे संचालक बाळासाहेब पवार, डॉ. एम. डी. गोसावी, श्रीमती पिंकी शेख, दिशा शेख उपस्थित होते.

यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे म्हणाले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी http://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या तृतीयपंथीयांना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते. अशा ओळखपत्र प्राप्त तृतीयपंथीय व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी विविध शासकीय योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत‌. तेव्हा शासकीय योजना, उपक्रम व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी ‘ट्रान्सजेंडर’ नॅशनल पोर्टलवर नोंदणी करावी. असे आवाहन ही देवढे यांनी केले.

प्रशिक्षण कुशलतेने पूर्ण करून भविष्यात त्याचा आत्मनिर्भर बनण्यासाठी उपयोग करून घ्यावा. यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य समाज कल्याण विभागाकडून केले जाईल. अशा शब्दांत देवढे यांनी उपस्थित तृतीयपंथीयांना आश्वासत केले. नायब तहसीलदार श्वाघचौरे यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत तृतीयपंथीयांना माहिती दिली. यावेळी स्वच्छता पंधारवाडाच्या निमित्ताने उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

Previous Post

बि.आर. फाउंडेशन द्वारा संजीत में स्वैच्छिक रक्तदान शिविर

Next Post

पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन

Next Post

पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version