पुणे : तारा मोबाईल क्रेशेस संस्थेच्या वतीने “बांधकाम साईट वरिल मुलांसाठी राबवली जाणारी सहभाग प्रक्रिया आणि त्याचे महत्व” या विषयावर पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. तारा मोबाईल क्रेशेस संस्था बांधकाम साईटवरील मुलांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात डे केअर सेंटर चालविते.
यावेळी सदर बांधकाम साईट वरील मुलांनी बांधकाम साईटवर आरोग्य, संरक्षण, शिक्षण, मनोरंजन या संदर्भातील मुलांसाठी राबविणारी सहभाग प्रक्रिया सांगितली. संस्थेच्या वरिष्ट कार्यक्रम समन्वयक सोनाली मोरे यांनी सहभाग प्रक्रियेचा उद्देश, जन्म ते आठ आणि आठ ते अठरा वयोगटातील मुलांसाठी टप्प्या टप्प्याने जागतिक बाल हक्क संहितेचा आधार घेत सहभाग प्रक्रिया कशी राबवली जाते ते सांगितले. यासाठी संस्थेने केलेल्य. विविध उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर मुलांनी आपल्या मित्रमंडळामधील भूमिका आणि याद्वारे बाल सहभाग कसा मिळवला जातो हे स्पष्ट करताना विविध मित्रमंडळाचे कार्य सांगितले यांमध्ये मित्रमंडळाची ओळख आणि उद्देश, पंतप्रधान जबाबदारी, उपपंतप्रधान, शिक्षण मित्र, आहार मित्र, आरोग्य मित्र, खेळ मंत्री आणि सांस्कृतिक मित्र, कम्युनिटी मित्र, यांमधून बाल सहभाग वाढवण्यासाठी कार्य केले जाते.
मित्रमंडळामधून मुलांमध्ये स्वावलंबी बनवणे, आपले मत मांडणे, मुलांशी संबंधीत निर्णय घेण्यासाठी सेंटर पातळीवर सक्षम बनविणे असे कलागुण विकसित केले जातात. येणाऱ्या कालावधीत या विषयावर केंद्रित कार्यक्रम आखणे हा संस्थेचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.