पुणे : मंथन फाऊंडेशन व रिलीफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्ड व पोस्टाचे बचत खाते काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा १५५ देहविक्री करणाऱ्या महिलांनी लाभ घेतला.
मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सांगितले की, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी संस्था आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र काढणे, बचत खाते उघडणे तसेच संजय गांधी निराधार योजना अनुदानासाठी मदत करण्याचे काम संस्था करत आहे.
यावेळी मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, रिलीफ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बोरकर, संस्थेचे कार्यकर्ते वृषाली गोरे, श्रीराम देशपांडे, आरती गणुरे, गणेश खेडेकर, मेरी डिसोझा, वैशाली ओव्हाळ, आरती आंग्रे, मोनिका कांबळे, डॉ. अभिजीत कांबळे, डॉ. चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.
या शिबिराला नेमाडे, वरीष्ठ पोस्ट मास्टर; दिवेकर, पब्लिक रिलेशन ऑफिसर; व ऑपरेटर विनायक इंगळे, पुणे जिल्हा पोस्ट ऑफिस तसेच मार्गदर्शन जिल्हा रुग्णालय व पुणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचे सहकार्य लाभले.