पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेच्या अध्यक्षपदी लालचंद कुंवर यांची सहमतीने निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी विनोद लातूरकर, तर सचिवपदी घनश्याम येणगे आणि अरिहंत अनामिका यांची निवड झाली आहे.
इतर विभागाच्या निवडी पुढील प्रमाणे : विविध उपक्रम विभाग कार्यवाह : माधुरी गायकवाड, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह : स्वप्नील भोसले, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाह : मयूर पटारे, महिला सहभाग विभाग कार्यवाह : ऍड. परिक्रमा खोत, युवा सहभाग विभाग कार्यवाह : रुपेश जगताप, कायदे व्यवस्थापन विभाग कार्यवाह : ऍड. सचिन माने, विवेक जागर प्रकाशन कार्यवाह : नम्रता ओव्हाळ, मिश्र विवाह विभाग कार्यवाह : रविकिरण काटकर आणि सोशल मीडिया विभाग कार्यवाह : रोहित घोगरे यांची निवड झाली आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२e या वर्षासाठी ही कार्यकरिणी असणार आहे. कार्यकारिणी निवडीचे निरीक्षक म्हणून राज्यपदाधिकारी विशाल विमल यांनी काम पाहिले. यावेळी राज्य पदाधिकारी अँड. मनीषा महाजन यांच्यासह ३० कार्यकर्ते उपस्थित होते. पुस्तक भेट आणि पेढा भरवून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. बैठकीचे संचलन घनश्याम येणगे यांनी केले.
यावेळी विशाल विमल, मनिषा महाजन, एकनाथ पाठक, विनोद लातूरकर, घनश्याम येणगे, अरिहंत अनामिका, माधुरी गायकवाड, ऍड. परिक्रमा खोत, मयूर पटारे, नम्रता ओव्हाळ, रोहित घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप लालचंद कुंवर यांनी केला. ‘आम्ही प्रकाश बीजे’ हे गीत मयूर पटारे यांच्यासह सर्वांनी सादर करत बैठकीची सांगता झाली.