परभणी : सामाजिक क्षेत्रात सक्रिय काम करणारे दिपक मगर यांची मानव मुक्ती मिशनच्या परभणी महानगर अध्यक्ष या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात कॉ. राजन क्षीरसागर व कॉ. माधुरीताई क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी परभणीतले सर्व चळवळीचे मार्गदर्शक उपस्थित होते. मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या द्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे.