पनवेल : मिशन वात्सल्य योजनेच्या समितीची आढावा बैठक २५ जुलै रोजी पनवेल तालुक्याचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीसाठी तालुकास्तरीय लाईन डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते. युवा संस्थेच्या वतीने या समितीच्या बैठकीमध्ये चेतन वाघ यांनी प्रतिनिधित्व केले.
युवा संस्थेच्या वतीने मिशन वात्सल्य अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या ४९ अर्जाची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये अर्ज भरताना विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनेसाठी पात्र महिलांना अधिकचा लाभ देण्यासाठी युवा संस्था कशा पद्धतीने मदत करते याची माहिती देण्यात आली.
यावेळी युवा संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘सामाजिक सुरक्षा योजना’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन पनवेलचे तहसीलदार तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तहसीलदार यांनी पुस्तिकेचे कौतुक करताना पुस्तिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोड मुळे लोकांना यापुढे योजनेचे फॉर्म हे डिजिटल पद्धतीने मोबाईलमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तहसील पातळीवर किंवा योजनेचे फॉर्म घेण्यासाठी आता शासकीय कार्यालयात जावे लागणार नाही असे मत व्यक्त केले.