नवी मुंबई (खारघर) : सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांची माहिती पनवेल तालुका आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना देण्यासाठी युवा संस्थेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावी, तसेच गरजू व्यक्तींना योजनांचा लाभ घेता यावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून युवा संस्था काम करीत आहे.
सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी बुधवारी दि. ६ सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.