लातूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे २० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. वंडर वर्ल्ड नाना–नानी पार्क, महापालिकेच्या समोर सायंकाळी ६ वा. कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यामध्ये सामाजिक बांधिलकी व कर्तव्य म्हणून यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. याचाच एक भाग म्हणून ईदच्या निमित्ताने सर्व धर्मियांसाठी ईद मिलनच्या निमित्ताने जिल्ह्यात शांतता, सामाजिक बांधिलकी, आपुलकी, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व सौहार्द वाढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
लातूर जिल्ह्याच्या प्रगतीचे दार नेहमीकरिता खुले राहावे व हम सब एक है यासाठी आजी–माजी लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनीयर, प्राचार्य, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार बांधवांनी यात सहभाग नोंदवावा, असेही अवाहन जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, जिल्हा संघटक सुधाकर फुले, शहराध्यक्ष महादेव डोंबे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर कारभारी, श्रीधर स्वामी, लिंबराज पन्हाळकर, अरुण कांबळे, इले. प्रमुख हरुण मोमीन, नितीन भाले, सी.एन. तोंडचिरकर, महिला प्रतिनिधी अहिल्या कसपटे यांनी केले आहे.











