पनवेल : रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन तर्फे पनवेलच्या संगुरली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ५० गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकं वाटप करण्यात आले. तसेच १०० रोपं लावण्यात आली. प्रत्येक विद्यार्थींना रोप वाटप करून त्यांना त्या रोपावर स्वतचं नाव टाकून ते रोप लावायला सांगितले.
यावेळी रोटरी खारघर मिडटाऊन तर्फे क्लबचे अध्यक्ष रोटरियन प्रशांत कालान, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश झिरपे, सेक्रेटरी अनामिका श्रीवास्तव व इतर रोटारियन उपस्थित होते. याबरोबर शाळेचे हेडमास्तर माधवी राजेंद्र दिवेकर , मुलांचे पालक तसेच गावातले मान्यवर उपस्थित होते.