सांगली : तरुणपिढीच्या लिंगभाव समानता या विषयासंदर्भातील जाणीवा अधिक व्यापक व्हाव्यात आणि स्त्री–पुरुष नातेसंबांतील जबाबदारीची, कर्तव्याची व परस्पर बाधींलकिची जाणीव जागृती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी या हेतूने सत्यशोधक प्रबोधनी संलग्न युवा विकास प्रबोधिनी सांगली आणि श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्तविद्यमाने “लिंगभाव समानता आणि स्त्री–पुरुष नातेसंबंध” विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचे मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदिप पाटील उपस्थित होते.
यावेळी उपस्थित तरुण–तरुणींना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले की, लिंगभाव समानता हि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावरती प्रभाव पाडणारा विषय आहे, सद्यस्थितीत समाजात संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली प्रचंड लिंगभाव विषमता पोसली जाते. हि लिंगभाव विषमता स्त्री आणि पुरूष या दोघांचेही सामाजिक, मानसिक, शारिरीक आणि आर्थिक या सर्व प्रकारे शोषण करते. यासाठी तरुण–तरुणींनी पुढाकार घेऊन लिंगभाव समानतेसाठी आपल्या स्वतःच्या लहान सहन कृतीत बदल घडवून आणावेत ज्यातून समाज बदलाची प्रक्रिया सुरू होईल. सोबतच स्त्री–पुरुष नातेसंबंध हे डिजिटल युगात अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचे बनतं चालले आहेत. सोशल मीडियावरती स्त्री–पुरुष संबंध जलदगतीने निर्माण होतात व तुटतात. त्यांच्यामध्ये प्रेमाऐवजी आकर्षण तयार झालेले असते. या आकर्षणातून गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. यासाठी तरुण–तरुणींनी स्री –पुरषांनी नातेसंबंध जपताना परस्परांना समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष वेळदेऊन, परस्परांची काळजी घेण्याचा शहाणपणा दाखवण्याची वेळ आली आहे.
यावेळी महाविद्यालचे प्राचार्य डॉ. बी. पी. लाडगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच उपप्राचार्य डॉ. म. डि. होणमाने, उपप्राचार्य डॉ. पी. एन. चौगुले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सत्यशोधक प्रबोधिनीचे महेश माने, दिगंबर माळी, सुदर्शन चौरगे यांनी पुढाकार घेतला. यासोबतच बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. एस. एस. वाडकर, स्टॅटिस्टिक विभाग प्रमुख डॉ.पी. आर. चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.











