गणेश उषा चव्हाण, टीम भटकंती
दर महिन्यात किमान एक तरी राईड- ट्रेक आपली ठरलेली असते. मात्र यंदा सगळेच जण बीझी असल्याने जुन जुलै मधे राईड झाल्या नाहीत. म्हणुन, नको देवराया अंत आता पाहू, लवकरी काढू राईड आता ..!
असा सर्वांचा एकसुर झाला आणि संडे फिक्स करून सगळ प्लॅनिंग केलं.
नेहमी पेक्षा ही राईड वेगळी करायच्या उद्देशानं, एक कल्पना ग्रुप समोर ठेवली. सर्वांना ती पटली, लगेच सर्वांनी होकार कळवला..आणि पुढे त्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या.
तर अवघ्या तीन दिवसात आंबा, पिंपळ, वड, अशोक, जांभूळ, फणस, कडूलिंब.. अशा ११० रोपांची जुळवणी झाली. फावडं, कुदळ ..अशी सर्व तयारी झाली. अविनाश नरवणकर कडे ८० रोपं होती तर माझ्याकडे २० होती. आणि इतरांनी चार दोन अशी १० रोपं सोबत घेतली होती. महापेला सर्वजण एकत्र भेटल्यावर प्रत्येकाच्या गाडीवर थोडी-थोडी रोपं दिली आणि या सिजनच्या पहिल्या राईडची सुरवात झाली.
आम्ही झाडांची रोपं घेवून आलो आहोत हे समजल्यावर तिकडचे फॅारेस्ट ॲाफिसर घोलप साहेब आम्हाला भेटले. आमची विचारपुस केली आणि सहभागी झाले..
घोलप सरांच्या हातूनच प्रथम पिंपळाच रोपं लावून या वृक्षापोपणाची सुरवात केली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, माहितीच्या ठिकाणी या ११० झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं.. या कामात घोलप सरांसोबतच, फॅारेस्ट ॲाफिसर क्षीरसागर मॅडम आणि बेंबले सर यांच सहकार्य लाभलं.
हि झाडं जपली जातील. आमचं लक्ष असतचं, तुम्ही सुद्धा आधुन मधून भेट देऊ शकता अस आम्हाला सांगितलं.
पोरांनी, .. पार, कुदळ, फावडं हाती घेवून पटापट खड्डे घेतले. गोटू दादा, सचिन कांबळे, संकेत, महेश, मनसुख, अमित, हे पुर्ण घामाने भिजले तर अमोल च्या हाताला फोड आला होता.. प्रत्येक जण नसांगता पळत होते. यात मुली सुद्धा अगदी खांद्याला खांदा लावून झटून काम करत होत्या. सगळेच नथकता, अगदी उस्त्साहात काम करत होते. भटकंतीचं हे टिम वर्क पाहून कौतूक वाटलं.
तर काल फ्रेंडशिप डे सुद्धा होता.. !
या निमित्ताने ११० झाडांना निसर्गाच्या कुशीत नवजीवन देऊन आम्ही असाही मैत्री दिवस साजरी केला. झांडासारखा निस्वार्थी मित्र कुणी नाही. ते सावली देतात, फळं, फुलं देतात, औषधही देतात, सरपण देतात, आणि महत्वाचं म्हणजे ते ॲाक्सिजन देतात. आपल्या पर्यावरणाचं संतुलन झाडांनी राखलयं म्हणुन आपण जगू शकतोय.. हि काळ्या दगडावरची रेघ आहे.
वृक्ष चळवळ हाती घेतलेले सयाजी शिंदे, पिंपळाच्या झाझाखाली ज्ञानप्राप्ती झालेले गौतमबुद्ध, झाडांसाठी आग्रही असणारे सम्राट अशोक, जंगल जपली जावीत म्हणुन सांगणारे छत्रपती शिवाजी, आणि वडाच्या झाडाला आपल्या रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदचिन्ह करणारे कर्मवीर आण्णा ..
या सर्वांच्या प्रेरणेतून हा वृक्षरोपणाचा छोटासा कार्यक्रम टिम भटकंतीच्या माध्यमातून पार पाडला.
पुढे उरलेल्या वेळात, आमच्या आवडत्या बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन सर्वांनी फुल्ल धमाल -मजा -मस्ती करत पाण्यात मनसोक्त उड्यामारत हा दिवस एन्जॅाय केला. चार वाजता, झणझणीत चिकन, तांदळाची भाकरी, भात असं पोटभर जेवण करून परतीचा मार्ग धरला…
टिम भटकंती हा उपक्रम दरवर्षी राबवणार आहे.
तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता.