जालना : महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा येथील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या १४ विद्यार्थ्यांची समुदाय विकास विशेषीकरण क्षेत्रकार्य अंतर्गत एक्सपोजर व्हीजिट सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, जालना येथे झाली. कार्ड संस्थेचे प्राचार्य डॉ. नंदू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या क्षेत्रभेटी दरम्यान कार्डचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामदास निहाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी आवाहन केले की, जोपर्यंत आपल्या देशातील समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्तीचा कुटुंबाचा विकास होत नाही तोपर्यंत आपल्यादेशाने विकास केला असे म्हणू शकणार नाही. त्यामुळे आपण शेवटच्या घटकातील व्यक्तींना विकासाच्या प्रक्रियेतसहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तरच देशाची प्रगती साधता येईल असे प्रतिपादन केले.
कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे यांनी कार्ड संस्थेची स्थापना, उद्देश, ध्येय पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेले विविधसामाजिक उपक्रम, कृषी व ग्रामीण विकासाचे प्रकल्प याबाबतची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्था चालवतअसताना येणाऱ्या अडचणी पुढील नियोजन व संस्थेच्या कार्याची पद्धती याबद्दल प्रश्न विचारले.
एमएसडब्ल्यू चे विद्यार्थी विशाल गोरे, वैभव राजपूत, सीमा जाधव, वनमाला गाढवे, ऋतिक पवार, सुजाता गवई, किरणवाडेकर, अजय सुरडकर, प्रकाश गुळवे, जितेंद्र महाजन अभिलाषा काकड, यमुना वाडेकर, मयूर साळीक, विशाल आराकआदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.