पुणे (राजगुरुनगर) : जागतिक प्लास्टिक मुक्त दिनानिमित्त शिवजन्मभूमी शिवनेरीवर किल्ल्यावर हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.
यावेळी तीन पोती प्लास्टिक कचरा फाउंडेशनच्या सभासदांनी गोळा केला. फाउंडेशनच्या वतीने खेड तालुक्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी गड किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ किल्ले शिवनेरी वर स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. ‘आपल्या पूर्वजांच्या परक्रमाची साक्ष देणारे गड किल्ले या पवित्र वास्तू असून त्यांचे योग्य रीतीने जतन करणे, तेथे स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे’. या हेतूने हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनच्या वतीने सदर अभियान राबविले.
यावेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, वन अधिकारी रमेश खरमाळे, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव आरती ढोबळे , जिजाऊ ब्रिगेड जुन्नर तालुका अध्यक्षा चित्रा कोकणे, रुपश्री सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी नवले आदी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांनी फाउंडेशनच्या सर्व संचालकांचा सत्कार करून भोजन व्यवस्था केली.