दोन श्वासातील अंतर म्हणजे आई-बाळाचे नाते . मग ती आई आणि मूल एकमेकांशी एका नाळेने जोडले गेलेले असो वा नसो. जन्मलेल्या बाळाला आपल्या आईकडून नेहमीच हे आईपण अनुभवायला मिळेलच असे नाही. काही अपरिहार्य कारणांमुळे आई व बाळाची ताटातूट होऊ शकते, मग अशा वेळी बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे दूध मिळवणे अवघड होते. याच मातृत्वाच्या उत्तरदायीत्वातून उभ्या राहिल्या सरकारी आणि खाजगी ‘ मिल्क बँक ‘ . वाचायला आशादायक असले तरी त्यांच्याकडे मदतीसाठी स्वइच्छेने पडणारी स्तनदा मातांची पावले ही त्यामानाने अगदी कमी आहेत .
महाराष्टातील काही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक ‘ ही यंत्रणा राबवली जाते. त्यांच्या माध्यमातून दूधदान करण्याच्या हेतूने वळणारी पावले भविष्यात वाढतील याची आम्हाला खात्री आहे . त्यासाठी आम्ही आमच्यापरीने यापूढे शक्य तितके काम करण्याचा प्रयत्न करू…गेले अनेक दिवस आम्ही या विषयावर अभ्यास – चर्चा करत असताना, सरते शेवटी असे लक्षात आले की, जर एखाद्या बाळासाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ मधून दूध विकत घेण्याची गरज लागली आणि त्याच्या सोबत असणाऱ्या त्याच्या माणसांची आर्थिक परिस्थती बिकट असेल तर काय ? आणि अखेर आम्ही या निर्णयापर्यंत पोहचलो.
#helping_hands_for_FEEDING या नावाने आजपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. महाराष्ट्रात नव्याने जन्म घेतलेल्या बाळाला ‘ह्यूमन मिल्क बँक’ मधून दूध विकत घेण्याची गरज पडल्यास आणि त्याच्या सोबत असणाऱ्या माणसांची आर्थिक परिस्थती बिकट असल्यास , त्या बाळाच्या दुधासाठी लागणारा जो काही आर्थिक खर्च असेल तो आम्ही आमच्या पात्रतेनुसार उचलण्याचा प्रयत्न करू त्यासोबत दूधदानाच्या अनुषंगाने सामाजिक दृष्ट्या जे काही करणे गरजेचे असेल ते करण्याचा प्रयत्न करू•
हे आमच्या परीने उचलेले एक लहानसे पाऊल असले तरी , मनाने आणि विचाराने ‘ आई ‘ म्हणून हे माणूसपणाचे हात कामी यावेत आणि नव्याने जन्म घेतलेले एकही बाळ आईच्या दुधाशिवाय राहू नये इतकेच या निमित्ताने .
टीप- वरील बाबीच्या अनुषंगाने काम करताना संबंधितांच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण पडताळणी केली जाईल, याची नोंद घ्यावी.
TEAM
HELPING HANDS FOR FEEDING
Rahul Siddharth Salve
9967116687