सांगली : वंचीत समुहातील, दारिद्रय रेषेखालील कुटुंब व भटके विमुक्त जमातीतील महिला व पुरुषांचा ई – श्रम कार्ड नोंदणीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. अग्रणी सोशल फौंडेशन विटा, ग्रामपंचायत मानेवाडी ता. आटपाडी व अग्रणी कम्युनिटी सेंटर खरसुंडी जि. सांगली यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बहुतांशी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोफत श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली. याचा लाभ केंद्रीय पातळीवरुन होणार आहे. यासाठी मानेवाडी ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले.
हे नोंदणी शिबीर यशस्वी करण्यासाठी अग्रणी सोशल फौंडेशन विटा या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज कांबळे व संचालक आप्पासाहेब माने यांनी परिश्रम घेतले.