पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे येथे झाली. या बैठकीचे उदघाटन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बाबांनी जोशपूर्ण मनोगत व्यक्त करत सदिच्छा दिल्या.
यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष महादेवराव भोईभार, प्रधानसचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, नंदकिशोर तळाशीलकर, राज्यपदाधिकारी विशाल विमल आदी उपस्थित होते. बैठकीचे संयोजन महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा, आकुर्डी, चाकण आणि जिल्हा शाखेने केले होते. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी, जिल्हा कार्याध्यक्ष सचिव आणि सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.







