सातारा : बालमजुरी विरोधात जनजागृती अभियान सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बाल हक्क कृती समिती (आर्क) पुणे, CACL नेटवर्क आणि मायरा फाउंडेशनच्या वतीने हे जनजागृती अभियान होत आहे.
यानिमीत्ताने साताऱ्यातील इंदिरानगर वस्तीमध्ये वीटभट्टी कामगार व त्यांच्या मुलांसोबत बालमजुरी या विषयावर संवाद साधण्यात आला. बालकांना शाळेत पाठवणे का गरजेच आहे याचे महत्व पालकांना पटवून दिले. बालकांना सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी मोठ्या माणसांची जबाबदारी आणि बालकांना शिक्षणाचे आपल्या आयुष्यात महत्व यावर पालकांशी संवाद झाला. यावेळी वस्तीमधील पालकांचा व मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.