औरंगाबाद : महाराष्ट्र अंनिसची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत शिवाजीनगर पुणे शाखेला लक्षवेधी पुरस्कराने गौरविण्यात आले. शाखेने संघटनेच्या कामासाठी मोठया प्रमाणात निधी संकलन केल्याने हा पुरस्कार देण्यात आला.
शिवाजीनगर पुणे शाखेचे कार्यकर्ते आणि राज्य पदाधिकारी विशाल विमल, राज्य पदाधिकारी हर्षदकुमार मुंगे, जिल्हा सचिव सम्यक वि म, शाखा कार्याध्यक्ष विनोद खरटमोल, सचिव श्याम येणगे यांनी यावेळी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे, उपाध्यक्ष रश्मी बोरीकर, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, व्यवस्थापकीय संपादक अजय भालकर आदी यावेळी उपस्थित होते.