अलिबाग : जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त मुरुड मेडिकल असोसिएशनच्या वतीने पारुहर येथील वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. वृद्धाश्रमातील ४० वृद्धांची यावेळी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या वतीने अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबीर घेऊन वेगवेगळ्या घटकातील लोकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हूणन अलिबाग तालुक्यातील पारुहर येथील वृद्धाश्रमातील वृद्धासाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी अलिबाग मुरुड मेडिकल अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी यांनी वृद्धांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच वृध्दाश्रमासाठी तांदूळ आणि वृद्ध महिलांना साडी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सेक्रेटरी डॉ. प्रणाली पाटील, उपाध्यक्ष डॉ. सुनीत पाटील, डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. सुबोध पाटील, डॉ. चेतन पाटील, डॉ. जुईली टेमकर आदी मान्यवरासह वृद्धाश्रमाचे संचालक ऍड. गुंजाळ उपस्थित होते.