कोकण विभाग : युवा मोरया भरारी प्रतिष्ठान तर्फे ‘चला विद्यार्थी घडवूया’ उपक्रमाअंतर्गत समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. माणगाव, रायगड, दापोली आणि रत्नागिरी तालुक्यामधील १० गावांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
युवा मोरया भरारी प्रतिष्ठान संस्था गेल्या अनेक वर्षभरापासून विविध उपक्रम राबवत आहे. समाजातील आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे व अशा प्रकारचे अनेक उपक्रम संस्था राबवत आहे. अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक श्रीराम महाडिक व अध्यक्ष नागेश शेडगे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.
या उपक्रमासाठी उपस्थित आधारस्तंभ मार्गदर्शक श्रीराम शांताराम महाडिक युवा मोरया भरारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश नामदेव शेडगे उपाध्यक्ष संताजी नाना अंबावले राज्य सचिव संजोग दिनेश शेडगे सल्लागार अनंत भाऊराव चव्हाण पर्यावरण समिती अध्यक्ष मुकेश रामनांदे दापोली तालुका उपाध्यक्ष रवींद्र वारणकर कार्यकारिणी सदस्य नथुराम दरेकर, दिपेश दिलीप शेडगे, राम चव्हाण, अविनाश पाटणे, वैभव पांगले उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संस्थेस मदत करणाऱ्या व्यक्तींचे संस्थेच्यावतीने संस्थेच्या दापोली तालुका उपाध्यक्षांनी आभार मानले.