हैद्राबाद : ग्रामीण भागातील वंचित कुटुंबांच्या प्राथमिक आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेल्स फार्गोने स्माईल फाऊंडेशनसोबत नवीन स्माईल ऑन व्हील्स मोबाइल मेडिकल युनिट सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. बेंगळुरू आणि चेन्नईमधील प्रकल्पांव्यतिरिक्त वेल्स फार्गोचा हा तिसरा स्माइल ऑन व्हील्स प्रकल्प आहे. या तीन मोबाइल वैद्यकीय युनिट्सचे लक्ष्य दरवर्षी ४५००० हून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबांना लाभ देण्याचे आहे.
स्माइल ऑन व्हील्स हा एक मोबाइल आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो दुर्गम ग्रामीण भागातील वंचित कुटुंबांपर्यंत उपचारात्मक, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवा पोहोचवतो. ज्या ठिकाणी सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत किंवा असणाऱ्या सुविधा अक्षम आहेत त्या ठिकाणी स्माइल ऑन व्हील्स उपक्रम फायद्याचा आहे. स्माइल ऑन व्हील्स द्वारे दरवर्षी १०,००,००० पेक्षा जास्त मुलांच्या आणि कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.