ठाणे : ऋण वसुंधरेचे या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील तीन सामाजिक संस्थाच्या वतीने येऊर येथील जंगलात १०० झाडांची लागवड करण्यात आली. वातावरण बदलांमुळे निसर्गावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी अधिकाधिक झाडांची लागवड करून ती वाढवणे गरजेचे आहे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
वसुंधरा फाऊंडेशन, हिलिंग सह्याद्री फाऊंडेशन आणि मिशन ऑनलाईन स्वराज्य ह्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये वड, आंबा, चिकू, आवळा इत्यादी देशी झाडांची लागवड करण्यात आली. यापुढे देखील टप्प्याटप्प्याने अजून झाडांची लागवड करण्यात येणार असून अधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन वसुंधराच्या संस्थापिका सुदर्शना जगदाळे यांनी केले आहे.