पुणे : आय. एल. एस. विधी महाविद्यालय व स्विसएड संयुक्त प्रयत्नांतून दोन दिवसीय राज्यस्तरीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२ व १३ ऑगस्ट रोजी आय. एल. एस. विधी महाविद्यालय येथे कार्यशाळा संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेदरम्यान निवास, जेवणाची सोय आणि प्रवासखर्च संयोजकांमार्फत करण्यात येणार आहे. प्रवासखर्च (जाण्या-येण्याचा मिळून) जास्तीत जास्त १८०० रुपये पर्यंत (प्रति व्यक्ती) देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींची माहिती पुढील फॉर्म मध्ये भरून देण्यात यावी अशी सूचना आयोजकांनी केली आहे. https://docs.google.com/forms/d/1pKTdVotHGz3vTCG_lgFj75ks0Yd1bVA4uKv7Rw9j_mo/viewform?edit_requested=true