• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

सांगली अंनिसकडून बेळगाव येथील महिलेचे जटा निर्मूलन

NGO ख़बर by NGO ख़बर
December 24, 2023
in NGO घडामोडी
0
6e999b08 D00b 4b0c 88ad 3011386aec84 1.jpg

सांगली : जटा वाढविणे, देवीच्या नावाने मुलींना देवदासी म्हणून सोडणे अशा प्रथा या अज्ञान व अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या असतात. कोणताही देव वा देवता जटा वाढवायला सांगत नाही. उच्चशिक्षित, उच्चभ्रू समाजातील स्त्रियांच्या केसात जटा नसतात. मात्र आर्थिकदृष्टया अत्यंत मागासलेल्या व अज्ञानी महिलांच्या केसात या जटा दिसून येतात. कारण यासारख्या अनेक अनिष्ट प्रथा, रूढी व परंपरा गरिबांच्या आयुष्यात या केवळ अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या दिसून येतात. स्वच्छतेच्या अभावामुळे, केसांची निगा न राखल्यामुळे केसांचा गुंता वाढतो, त्याकडे दुर्लक्ष झालं की, धूळ, माती साचून हा गुंता वाढून शेवटी सर्व केसांची एकच वजनदार जट तयार होते. मानेला ओझं पेलवयाला त्रास होतो. मान वळवायला त्रास, झोपेला त्रास, नीट झोपता येत नाही, कूस बदलताना त्रास होतो. परंतु हा त्रास सहन करायचा असतो, असा समज रुढी-परंपरेने करून दिलेला आहे. परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार, ही भीतीही मनात घर करून असते.

यासाठीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शाखेच्या वतीने जटा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले आहे. अंनिसच्या या शाखेतील कार्यकर्त्यांकडून २२ डिसेंबर २०२३ रोजी बेळगावातील भक्ती भारत पेडणेकर या महिलेचे जटा निर्मूलन करण्यात आले. ही महिला जवळजवळ पाच वर्षे मोठ्ठ्या आंबाड्याएवढा बुचडा होईल अशी मोठ्ठी आणि वजनदार जट डोक्यावर वागवत होती. तत्पूर्वी बेळगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले, त्यांचे भाऊ अर्जुन चौगुले, उपाध्यक्ष ज्योतीबा अगसमिनी, जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर नानावटी आणि पुष्पा चौगुले यांनी या महिलेचे समुपदेशन करून तिला जट काढण्यास राजी केले होते. अशा वजनदार जटेमुळे मानेचे रोग उद्भवतात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात हे तिला समजावून दिले आणि डोक्यावरील केसांची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे समजावून दिले. केसांची निगा नीट राखली तर डोक्यात कधीही जट निर्माण होणार नाही, हेही तिच्या मनावर बिंबवले.

या महिलेच्या जटा काढण्यापूर्वी तिचा नवरा, सासू, भाऊ आणि मुले अशा सगळ्या कुटुंबियांची संमती आहे आणि खुद्द जटाधारी भक्ती पेडणेकर स्वेच्छेने जटा काढण्यास तयार आहे, असे ‘संमती पत्र’ त्यांनी सह्यानिशी लिहून दिले. त्यानंतर जटा काढण्याचा कार्यक्रम झाला. ही जड जट काढताना अत्यंत कौशल्यपूर्वक कातरकाम करावे लागते. ते आशा धनाले यांनी अत्यंत सहजगत्या तिला दुखतय-खूपतय का अशी विचारपूस करून अगदी हलक्या हाताने सावकाशपणे भली मोठी जट तिच्या डोक्यावरून कापून काढली. या कामी तिला त्रिशाला शहा यांनी खूपच मोलाची मदत केली. या कार्यक्रमानंतर जमलेल्यांचे प्रबोधन करताना अंनिसचे कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले; तर जटा काढल्यामुळे देवीचा होप होईल किंवा कोणत्यातरी प्रकारचा त्रास होईल याची भीती महिलांनी मनातून काढून टाकली तर आपण या अंधश्रद्धेपासून निश्चितच दूर राहू, असे अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेळगाव शाखेच्या अंनिसचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जमलेल्या स्त्रियांनी ‘यापुढे आम्ही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासणार नाही असे सांगितले.’ जटा निर्मूलनाच्या या कार्यक्रमाचे हे फलित आशादायक आहे.

Previous Post

नंदीवाले समाज जात बांधवांचे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयाबाबत प्रबोधन

Next Post

कलारंग २०२४ – हस्तकला प्रदर्शन २६ व २७ जानेवारीला लोणावळ्यात; विविध कलाप्रकारांची होणार उधळण !

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved