पुणे : विश्वरत्न महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विज्ञानरूपी अभिवादनातून पुणे, नागपूर परभणी, नाशिक विभागातून एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन व ९० जनांचे कोवीड लसीकरण करण्यात आले. दर वर्षी ६ डिसेंबर रोजी देशाच्या काना-कोपऱ्यातून अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी मुंबई येथे जात असतात. संपुर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना आपला त्यात खारीचा वाटा असावा या हेतूने समता सैनिक दल तसेच सर्व संघटना, मंडळे, बुद्धविहार व समस्त आंबेडकर अनुयायांच्या वतीने कोरोनाचे संकट टाळण्यासाठी चैत्यभूमीला न जाता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आहे तिथूनच रक्तदान व कोविड लसीकरण करूण बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाचे सॅल्युटेशन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली.
रक्त – जिथे जात, धर्म, लिंग, पंथ, भाषा गळून पडतात परंतु अज्ञान व रक्तदानाबद्दल जागृती नसल्या कारणाने आज राज्यात मुबलक असा रक्त साठा नाही. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता आंबेडकर अनुयायांनी भावनीक न होता कृतीशील अभिवादनाला प्राधान्य दिले.
विभागानुसार एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन
नागपुर – ५१५ + पिंपरी – १९१ , नाशिक – ४५ , परभणी – २६, औंध – 25, भेकराईनगर – २२ , पुणे स्मारक – 21
समता सैनिक दलाच्या वतीने सर्व आयोजक टिमचे मनपूर्वक अभिनंदन करून कोणाचेही आभार न मानता आपल्या सर्वांचे हे आद्य कर्तव्य समजून मानवहिताच्या कार्यात बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होवुन तन मन धनाने आपण सदैव कार्यरत रहाल अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.