पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” पुरस्कार कणकवलीच्या कवयित्री आणि आदर्श शिक्षिका सरिता पवार यांना प्रदान करण्यात आला.
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस्मरण पूर्वसंध्येला ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी
डॉ. श्रीपाल सबनीस आणि त्यांच्या सहचारिणी कवयित्री ललिता सबनीस यांना “सावित्री – ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सबनीस यांनी सामाजिक विषमतेवर आसूड ओढणारे आणि मन हेलावून टाकणारे परखड, सडेतोड भाष्य केले. तर
समस्त भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पासवर्ड असणाऱ्या क्रांतीज्योतिच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराची जबाबदारी आणि तो आदर टिकविण्याचे भान जगण्याच्या प्रत्येक क्षणी असेल अशा भावना सरिता पवार यांनी व्यक्त केल्या.