सोलापूर : कुष्ठरोगी रुग्णांना एक वेळचे जेवण मिळावे म्हणून “नो शेव नोव्हेंबर” उपक्रमांतर्गत नोव्हेंबर महिन्यामध्ये दाढी न करता वाचलेल्या पैशातून गरजूंना अन्नदान करण्यात आले. सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली.
शहरातील हॉटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या रॉबीन हुड आर्मीच्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो. आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील भावार्थी, अनिकेत चनशेट्टी, नरेश मलपेद्दी, विघ्नेश माने, नागेश मार्गम, सुमित कोनापूरे, रविकुमार चन्ना, जगदीश वासम, गोपाळ नाडीगोटू, विलास शिंदे, सुभाष कुरले, अपूर्व जाधव, स्वप्नील गुलेद, ओंकार कांबळे आदींनी परिश्रम घेतले.