पुणे : शहीद कॉम्रेड भगतसिंग जयंतीनिमित्त आज ‘श्रमिक हक्क आंदोलन’ व ‘न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन’ संलग्न नव समाजवादी पर्याय तर्फे आज दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी बालगंधर्व ते गुडलक चौक अशी रॅली काढण्यात आली. यात पुणे शहरातील शंभराहूनही अधिक तरुण व कामगार सहभागी झाले होते.
सदर रॅली मध्ये भगतसिंग चे विचार सांगणारे विविध फलक व दृश्य, पोस्टर्स उभे केले होते. रॅली ची सुरवात भगतसिंग चा झेंडा नचवण्याने व घोषणांनी जोरदार सुरुवात केली गेली. पत्रक, गाणी व भाषण यांच्या माध्यमातून सामान्य जनतेशी संवाद केला गेला.
यावेळेस बोलताना ‘श्रमिक हक्क आंदोलन’चे येरवडा विभाग चे अल्केष गावीत यांनी “भगतसिंग व त्याचे साथीदार यांचे ध्येय केवळ ब्रिटिशांपासून देश स्वतंत्र करणे इतके नव्हते. त्यांच्यासाठी हा केवळ एक टप्पा होता. त्यांचे खरे ध्येय एक नव्या प्रकारचा देश घडविणे, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकणारा समाज घडवणे हे होते “. म्हणून आज भगतसिंह कामगार कष्टकरी जनते ने समजुन घेणं का गरजेचं आहे आहे हे सांगितले. याच सोबत कामगार प्रतिनिधी बालाजी झुकझुके यांनी ही कामगारांची परिस्थिती मांडली.
यावेळेस श्रमिक हक्क आंदोलनाचे सरचिटणीस सागर सविता धनराज, उपाध्यक्ष जगदीश राठोड, सचिव मकरंद पवार, अखलाक खान, यलम्मा गुल्लाशेठ, रवी राठोड, बालाजी झुकझुके, देविदास पवार, अंगुर खत्रावत तसेच नव समाजवादी पर्यायचे मनोज वाघमारे, कपिल चव्हाण, हे उपस्थित होते.
यानंतर ‘न्यू स्टुडंट्स अँड युथफेडरेशन’चे प्रथम नाईक यांनी तरुणांशी संवाद साधताना की ‘भगतसिंग हे केवळ भावनिक रित्या लढणारे तरुण नव्हते. त्यांनी देशाचा, समाजाचा विविध विचारसरणीचा अभ्यास करून त्यानंतर मार्क्सवादी विचारसरणीचा स्वीकार केला. त्यानुसार त्यांनी एक समाजवादी राष्ट्र उभारण्याचा निर्धार केला.” हे मत मांडले.
या सोबत NSYF च्या कार्यकर्त्यांनी भगतसिंगचे विविध पैलू आपल्या भाषणातून मांडले. कामगार -कष्टकरी आणि तरुणांची ही रॅली अतिशय जोरदार पणे पार पडली.